About Us

दैनिक लोकरक्षणाय हे सन २०२३ मध्ये नोंदणीकृत झालेले मराठी दैनिक असून, विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकारिता करण्यासाठी कटिबद्ध आहे. ठाणे जिल्ह्यातून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, शहरे आणि ग्रामीण भागातील घडामोडींचे व्यापक वार्तांकन करते. यासोबतच देशातील आणि जगभरातील महत्त्वाच्या घटनांनाही प्राधान्याने स्थान देते.

अल्पावधीतच दैनिक लोकरक्षणाय ने ठाणे, मुंबई आणि नवी मुंबई परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून वाचकांचा वाढता विश्वास आणि प्रतिसाद मिळवला आहे. वस्तुनिष्ठ वृत्तांकन, विधायक पत्रकारिता आणि समाजाशी सातत्यपूर्ण संवाद यांच्या बळावर वृत्तपत्राचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे.

"ध्यास सकारात्मकतेचा" या उपक्रमाच्या माध्यमातून दैनिक लोकरक्षणाय सकारात्मक विचार, प्रेरणादायी कार्य आणि समाजहिताच्या उपक्रमांचा प्रसार करण्याचे कार्य करत आहे. सकारात्मक विचार आणि सकारात्मक कृती यांच्या आधारावर अधिक सशक्त, संवेदनशील आणि प्रगत समाज घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या ध्येयाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी "लोकप्रेरणा अभियान" हा नवीन आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कृतीशील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि परिवर्तनाची इच्छा असलेल्या नागरिकांना एकत्र आणून समाजहितासाठी कार्य करणारी प्रभावी टीम निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

About Dainik Lokrakshanay

Dainik Lokrakshanay is a registered Marathi daily newspaper established in the year 2023, committed to delivering credible, people-centric, and socially responsible journalism. Published from Thane District, the newspaper provides comprehensive coverage of news and developments from Mumbai, Navi Mumbai, Raigad, Palghar, Nashik, Pune, Nagpur, Kolhapur, Solapur, and numerous other districts, cities, and villages across Maharashtra, while also covering significant events from across India and around the world.

Within a short span, Dainik Lokrakshanay has earned growing recognition and readership, particularly in Thane, Mumbai, and Navi Mumbai, through its dedication to factual reporting, constructive journalism, and community engagement. The newspaper continues to expand its reach while remaining committed to the interests and aspirations of common citizens.

Guided by its inspiring initiative "Dhyaas Sakaratmaktecha" (A Commitment to Positivity), Dainik Lokrakshanay actively promotes positive thinking, inspiring stories, and constructive social action. The initiative aims to foster a society driven by optimism, responsibility, and meaningful contributions towards collective progress.

Furthering this mission, the newspaper is launching "Lokprerna Abhiyaan", an upcoming people-centric movement designed to bring together action-oriented individuals, social contributors, and changemakers. The initiative seeks to build a strong network of citizens dedicated to creating positive transformation and sustainable development within society.